What to do with tattoos after breakup

प्रेमी युगुलांचे उत्कट भाव ठरताहेत त्रासदायक; भांडणांचे प्रमाण वाढताहेत पिंपरी - प्रेम व्यक्त करण्याची तरुणाईची भाषाच वेगळी आहे. त्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. प्रेमाचा उत्कट भाव व्यक्त करण्यासाठी सध्या प्रेमी युगुलांमध्ये टॅटूची क्रेझ...

What to do with tattoos after breakup

प्रेमी युगुलांचे उत्कट भाव ठरताहेत त्रासदायक; भांडणांचे प्रमाण वाढताहेत
पिंपरी - प्रेम व्यक्त करण्याची तरुणाईची भाषाच वेगळी आहे. त्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. प्रेमाचा उत्कट भाव व्यक्त करण्यासाठी सध्या प्रेमी युगुलांमध्ये टॅटूची क्रेझ वाढली आहे. मात्र ब्रेकअप झाल्यास हातावर, मानेवर आणि छातीवर काढलेल्या या टॅटूचे काय करायचे, असा प्रश्‍न डोक्‍यात भुंगा करतोय.

सौंदर्य खुलविण्यासाठी तरुणांमध्ये टॅटू काढण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. अनेक प्रेमी युगुुलांनी भावनेच्या आहारी जाऊन टॅटू गोंदवले आहेत. काही कालावधीने दोघांत टोकाची भांडणे होऊन ब्रेकअप झाल्याच्या घटनांमध्येही तितकीच वाढ झाली आहे. 
टॅटूच्या माध्यमातून व्यक्ती, घटना, प्रसंग भावना व्यक्त केल्या जात असल्या, तरी तरुणांमध्ये ब्रेकअपनंतर टॅटू मिटविण्याची चिंता अधिक सतावत आहे. टॅटू मिटविण्यासाठीचा खर्च काढण्यास येणाऱ्या खर्चापेक्षा जास्त आहे. यासाठी प्लॅस्टिक सर्जरी, लेझर ट्रीटमेंट आणि टॅटू ‘कव्हर अप’चे पर्याय वापरावे लागत आहेत. मात्र हा पर्याय तितकाच खर्चिक आहे. त्वचा संवेदनशील असल्यास शारीरिक इजा होण्याचीही भीती जास्त आहे. दिवसाकाठी टॅटू स्टुडिओमध्ये असे विचारणा करणारे तीन ते चार प्रेमी युगुुल चकरा मारत असल्याचे टॅटू आर्टिस्ट सांगतात.

‘कपल’ टॅटूकडे अधिक कल
प्रेमी युगुुलांमध्ये ‘कपल’ टॅटूला अधिक कल आहे. यामध्ये मंडेला, बॅंड, थ्रीडी, माऊरी, विंगस असे विविध प्रकारचे टॅटू गोंदण्यास अधिक मागणी आहे. प्रेमी युगुुल हातावर, मानेवर, छातीवर आणि पाठीवर गोंदून घेतात. आवडत्या व्यक्तीच्या आठवणी जपण्यासाठीही ‘पोट्रेट’ टॅटूचा जास्त वापर केला जात आहे. आई, वडील, भाऊ, बहीण यांच्या स्मृती जपण्यासाठीही अशा टॅटूचा वापर केला जात आहे. महाविद्यालयीन तरुणांचे यामध्ये अधिक प्रमाण आहे. बरेच जण कुटुंबीयांना न सांगता टॅटू काढतात. प्रेमी युगुुल टॅटू स्टुडिओमध्ये यासाठी पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत मोजण्याची तयारी दर्शवितात.