VIDEO : मुंबईत आणखी एका शिवसेना पदाधिका-यावर हल्ला, पुन्हा गॅँगवार?

मुंबई : विक्रोळी येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका पदाधिका-यावर पवई येथे हल्ला झाला आहे. दोन युनियनच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.  शिवसेनेचे गोवा संपर्क प्रमुख व भारतीय कामगार...

VIDEO : मुंबईत आणखी एका शिवसेना पदाधिका-यावर हल्ला, पुन्हा गॅँगवार?

मुंबई : विक्रोळी येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका पदाधिका-यावर पवई येथे हल्ला झाला आहे. दोन युनियनच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. 

शिवसेनेचे गोवा संपर्क प्रमुख व भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जीवन कामत यांच्यावर गुरुवारी माथाडी कामगार युनियनच्या पदाधिकारी व कार्यकर्तायांनी हल्ला केला. याबाबत जीवन कामत यांच्याशी संपर्क साधला असता आपण पवई पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. संशयित आरोपींची माहितीही पोलिसांना दिल्याचे सांगितले. दरम्यान या हल्ल्यात कामत यांच्या चालकालाही मारहाण झाल्याचे समजले. 

 

Image may contain: car and outdoor

Image may contain: car and outdoor

 

 

गेल्या अनेक दिवसांपासून युनियनमध्ये वाद सुरू होते. तो वाद एवढा विकोपाला गेला की गुरुवारी थेट माथाडी येण्याच्या कार्यकर्त्यांनी कामत यांच्यावर हल्ला केला.  गुरुवारी दुपारी पवईतील रेनायसन्स हॉटेलजवळ गावात हा हल्ला करण्यात आला. गाडी पळवल्यामुळे ते बचावले. दरम्यान, हल्ल्यात कामत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडीच्या डावा बाजूच्या खिडकीच्या समोरील काच फोडण्यात आली होती. 

Image may contain: people sitting and car

No photo description available.

 

 

 

नव्वदीत गॅँगवार प्रमाणेच युनियनचे वादही असेच रस्त्यावर पेटायचे. पण अलीकडच्या काळातले घडलेली ही पहिली घटना आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात मारहाण, दंगल आधी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी दिली.