Video : पुण्यात 'नागरिकत्त्व' विरोधात मोर्चा; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

स्वारगेट : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात पुण्यात मुस्लिम समुदाय आणि संविधान बचाव कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला बाबा जान दर्ग्यापासून सुरुवात झाली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या...

Video : पुण्यात 'नागरिकत्त्व' विरोधात मोर्चा; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

स्वारगेट : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात पुण्यात मुस्लिम समुदाय आणि संविधान बचाव कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला बाबा जान दर्ग्यापासून सुरुवात झाली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होते.

 

नागरिकांनी एनआरसीविरोधात घोषणा दिल्या. यामध्ये विविध संघटनांनी सहभाग नोंदवला. मुस्लिम समाजातील काही मान्यवर व मौलवी यांनी हा देश आमचा आहे येथे आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे हा आमचा देश आहे. आम्ही हिंदुस्थानी आहोत, हे सांगायला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही व या मातीतच आम्ही मिसळून जाणार आहोत, असे मुस्लिम मान्यवरांनी मत वक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालय येथे बाबाजान चौकातील कोहिनूर हॉटेलपर्यंत ही गर्दीची रांग लागलेली होती.

त्याचबरोबर आम्ही तुम्हाला या भारताचा विकास करून या देशातील नागरिकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे. पण तुम्ही या देशातील लोकांना बाहेर लावत आहात व समाजाचे दोन भाग पडत आहात असे शीख समाजाचे बोलासिंग अरोरा म्हणाले.

या देशांमध्ये ज्यांनी  गुन्हे केले व ते तडीपार झाले. आज तेच सामान्य नागरिकांना कायदा शिकवतात व समाजामध्ये जाती-जाती, धर्म-धर्मामध्ये भेदभाव करून समाजात फूट कशी पडेल याचाच रात्रदिवस ती विचार करत आहे . त्यामुळे आपल्या सत्तेसाठी कसे पोषक वातावरण तयार होईल हे काम सध्या सरकार करत आहे. त्यामुळे याला कोणताही सामान्य नागरिक बळी पडणार नाही. आम्ही तुम्हाला सत्तेवरून खाली उतरु व हा एनआरसी कायद्याला प्राणपणाने विरोध करू, असे सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे म्हणाल्या .