देशभरातील आंदोलनाचा अर्थव्यवस्थेला दणका; पर्यटकांनी रद्द केले बुकिंग

नवी दिल्ली : पर्यटन उद्योगाला फटका नागरिकत्व दुरूस्ती विधेयका (CAA) विरोधात होत असलेल्या आंदोलनांचा फटका पर्यटन उद्योगाला देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. मंदीसदृश परिस्थिती, नोकऱ्यांवर आलेली गदा आणि वाढती बेरोजगारी याचा एकत्रित फटका मागील वर्षांपासून...

देशभरातील आंदोलनाचा अर्थव्यवस्थेला दणका; पर्यटकांनी रद्द केले बुकिंग

नवी दिल्ली : पर्यटन उद्योगाला फटका नागरिकत्व दुरूस्ती विधेयका (CAA) विरोधात होत असलेल्या आंदोलनांचा फटका पर्यटन उद्योगाला देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. मंदीसदृश परिस्थिती, नोकऱ्यांवर आलेली गदा आणि वाढती बेरोजगारी याचा एकत्रित फटका मागील वर्षांपासून पर्यटन उद्योगाला बसला आहे. त्यातच आता CAA विरोधातील संघर्ष अधिक तीव्र होत चालल्याने ईशान्येकडील राज्ये तसेच जम्मू काश्मीर आणि दिल्ली येथील बुकिंग रद्द केली जात आहेत.

नाताळ सुटी आणि नवीन वर्षाच्या प्रारंभी पर्यटनाचा आनंद घेण्याचा नागरिकांचा कल असतो. त्यामुळे या काळासाठी अनेक सहली आयोजित केल्या जातात. मात्र नागरिकत्व दुरूस्ती विधेयका विरोधात आंदोलनाने उग्र रूप धारण केल्याने अनेक पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द करण्यावर भर दिला आहे. तर काहींनी फिरायला जायचे एक ते दोन महिन्यांकरता पुढे ढकलले आहे. परिणामी पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना एका नवीन आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.

 

ईशान्येकडील राज्यांत न जाण्याचा सल्ला
या अगोदरच अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा सरकारने भारतात फिरायला येणाऱ्या आपल्या नागरिकांना ईशान्येकडील राज्यात न जाण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, आता आंदोलनाचे लोण दिल्ली ते कोलकता पसरले आहे. तर, देशाची राजधानी दिल्ली आंदोलनाचे केंद्र बनत चालले आहे. महत्वाचे म्हणजे अमेरिका सारख्या देशात अनेक वृत्तपत्रांनी भारतातील संघर्षाला पहिल्या पानावर प्रसिद्धी दिल्याने पर्यटकांमध्ये नकारात्मक संदेश जाऊन त्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

 

भारतातील 70 टक्के बुकिंग्ज रद्द
दर वर्षी अमेरिका आणि ब्रिटन मधून सरासरी अनुक्रमे 14 आणि 10 लाख पर्यटक भारतात येत असतात. ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (TAFI)नुसार पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये जाणाऱ्या तब्बल 70 टक्के पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पर्यटन विभागाला अंदाजे 15 कोटींचा फटका बसला असण्याचा अंदाज आहे. महत्वाचे म्हणजे आर्टिकल 370 लागू झाल्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर कालावधीत तब्बल जम्मू काश्मीर मध्ये फिरायला जाणाऱ्या देशी पर्यटकांमध्ये तब्बल 87 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यातच CAA विरोधची भर पडल्याने पर्यटन उद्योगासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.