Partying on 31st night - beware of Peg Measurement

पुणे - थर्टी फस्टला तारांकित हॉटेलमध्ये पार्टी करायला जात असाल आणि मद्यपान करणार असाल, तर ‘पेग’च्या मापाची खात्री करा. अन्यथा दारूच्या मापात फसवणूक होऊ शकते. याची दक्षता ग्राहकांनी घ्यावी, तर हॉटेलचालकांनी पेग पद्धतीत एक मिली जरी दारू ग्राहकांना...

Partying on 31st night - beware of Peg Measurement

पुणे - थर्टी फस्टला तारांकित हॉटेलमध्ये पार्टी करायला जात असाल आणि मद्यपान करणार असाल, तर ‘पेग’च्या मापाची खात्री करा. अन्यथा दारूच्या मापात फसवणूक होऊ शकते. याची दक्षता ग्राहकांनी घ्यावी, तर हॉटेलचालकांनी पेग पद्धतीत एक मिली जरी दारू ग्राहकांना कमी दिल्यास प्रतिसंचालक पाच हजार रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या पुणे विभागाचे उपनियंत्रक सीमा बैस यांनी दिली.

थर्टी फस्टला नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच हॉटेलमध्ये नागरिकांची गर्दी असणार आहे. यापैकी तारांकित हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी अनेकांची पसंती असते. अशा हॉटेलमध्ये ९० मिलिलिटरच्या पेग मापात दारू दिली जाते. तर अनेक ठिकाणी अंदाजे दारू दिली जाते. अशा वेळी तेथे पेगमधून दिलेल्या अचूक दारूच्या मोजमापाची नागरिकांनी खात्री करावी, असे आवाहान वैध मापन शास्त्र यंत्रणेने केले आहे.