No Limits on Drinking - Special Alcohol invented!

नागपूर : दारूचे दुष्परिणाम सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यामुळे समाजात तिला वाईटही ठरवण्यात आले आहे. मात्र शरीरावर खास करून यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंडावर (किडनी) कुठलाच विपरीत परिणाम होणार नाही, असे अल्कोहोल एका नागपूरकराने विकसित केले आहे. राष्ट्रसंत...

No Limits on Drinking - Special Alcohol invented!

नागपूर : दारूचे दुष्परिणाम सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यामुळे समाजात तिला वाईटही ठरवण्यात आले आहे. मात्र शरीरावर खास करून यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंडावर (किडनी) कुठलाच विपरीत परिणाम होणार नाही, असे अल्कोहोल एका नागपूरकराने विकसित केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील फार्मसी विभाग आणि शासनमान्य ऍनोकॉन लॅबोरेटरीजनेही त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. मग विचार काय करता...? 

अनिरुद्ध कपाले यांना याकरिता दोन दशकांचा कालावधी खर्ची घालावा लागला. कपाले यांनी हिस्लॉप कॉलेजमधून 1990 साली बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. 1996-97 केंद्रीय उद्योग मंत्रालयातून सेवानिवृत्त झालेले उद्योग संचालक ध्रुवचंद झा यांच्या संपर्कात आले. त्यांनी देविका कन्सलटंट या कंपनीची स्थापना केली होती. त्यांच्या सल्ल्यानुसार जयशिव एक्‍सपर्ट ही कंपनी काम करीत होती.

त्यांनी मोहापासून पेय तयार करण्याचा परवाना काढला होता. त्यासाठी कळमेश्‍वरजवळ जमीनही घेतली होती. त्यांच्यासोबत काम करीत असताना अनिरुद्ध यांना वेगवेगळे प्रयोग करून पेये तयार करण्याची आवड निर्माण झाली. त्यातून व्हिस्की, व्होडका आणि स्कॉचसारखे पेय यशस्वीरीत्या बनविलेले. दरम्यान, 2012 मध्ये दिल्ली विद्यापीठातून फूड टेक्‍नॉलॉजीची पदवी घेतल्यानंतर यातूनच काहीतरी वेगळी निर्मिती करण्याचा ध्यास त्यांना लागला. त्याकरिता दीपाली आणि अनिरुद्ध या दाम्पत्याने ज्युनिअर अभिषेक हर्बल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून आरोग्यावर कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत, असे अल्कोहोल तयार करण्यात कपाले यांना यश आले. 

ना हॅंगओव्हर, ना दुष्परिणाम 
तयार केलेले पेय यकृत किंवा मूत्रपिंडावर दुष्परिणाम करीत नाही उलट आरोग्यासाठी उत्तम आहे. याच्या सेवनाने लघवीही पिवळसर होत नाही तसेच यामुळे आक्रमकता नियंत्रित राहते. विशेष म्हणजे यात कुठलीही रसायने किंवा रंगाचा वापर केलेला नसून पूर्णपणे हर्बलयुक्त आहे. यातील रंग केवळ पेय तयार करण्यात आलेल्या वनस्पतींपासून निघणारा आहे. याच कारणाने हॅंगओव्हरही होत नाही. एवढेच नव्हे तर मानवी शरीराला यापासून पन्नासपेक्षा अधिक अतिरिक्त फायदे मिळू शकणार आहेत. 
आतापर्यंत व्हिस्की, व्होडका आणि स्कॉचसारखे पेय यशस्वीरीत्या बनविलेले आहेत. 

सोमरसाची संकल्पना 
तयार केलेले फॉर्म्यूशन कोणत्याही मद्यामध्ये मिसळले तर ते यकृत आणि मूत्रपिंडासाठी उपयोगी ठरणार आहे. हे तयार करताना सोमरसाची संकल्पना समोर ठेवली होती. यात 42.8 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असले तरी आरोग्यासाठी उत्तम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. लवकरच युवा नावाची बिअरही विकसित करणार आहे. ती बिअर च्यवनप्राशचे फायदे देणारी आहे.