जाणून घ्या तुमचा रक्तदाब, बीएमआय, पल्स आणि शुगर

तुम्ही तुमचं शेवटचं वजन कधी केलंय आठवतंय? तुमचा रक्तदाब असो की ‘पल्स’, याचे आकडे तुम्हाला माहिती आहेत का? बरं, तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत जाणारी ‘शुगर’ किती आहे? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं ‘नाही’ असणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही घेऊन...

जाणून घ्या तुमचा रक्तदाब, बीएमआय, पल्स आणि शुगर

तुम्ही तुमचं शेवटचं वजन कधी केलंय आठवतंय? तुमचा रक्तदाब असो की ‘पल्स’, याचे आकडे तुम्हाला माहिती आहेत का? बरं, तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत जाणारी ‘शुगर’ किती आहे? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं ‘नाही’ असणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही घेऊन येतो आहोत ‘नो युवर नंबर्स’ हा अभिनव उपक्रम! 

कडाक्‍याची थंडी पडली तरीही आपल्याला सर्दी होत नाही की खोकला. वर्षानुवर्षे मला ताप येत नाही. डोकं दुखतंय म्हणून कधी अर्धी गोळी खाल्ल्याचंही आठवतं नाही. गेल्या चौदा-पंधरा वर्षांच्या नोकरीत ‘आजारपणाची रजा’! छे-छे-छे!!! ती तर नाहीच. असं असणं हे नक्कीच चांगलं आहे. पण, हे असं असताना ते कायम राहिलं पाहिजे. त्यात सातत्य असणं आवश्‍यक असतं. नाहीतर अचानक काहीतरी उद्भवतं आणि मग सुरू होतात रुग्णालयाचे खेटे. ‘चांगलं राहणं’ हे चार घटकांवर अवलंबून आहे. त्याला तंदुरुस्तीचे चार स्तंभ (four pillars of fitness) म्हटलं जातं. वजन उंचीचं गुणोत्तर (बीएमआय), रक्तदाब, आपल्या नाडीचे ठोके (पल्स) आणि रक्तातील साखरेचे प्रमाण (शुगर) हे तंदुरुस्तीचे चार स्तंभ आहेत.

असे व्हा सहभागी...
  या यादीतून तुम्ही तुमच्या भागातील रुग्णालय किंवा जवळचे डॉक्टर निवडून ब्लड प्रेशर, पल्स, शुगर आणि बीएमआय तपासा. 
  दर महिन्याला ही तपासणी करा आणि स्वतःच्या फिटनेस नंबरबद्दल जागरूक राहा.
 उपक्रमाला पाठिंबा देणारी पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील रुग्णालये आणि डॉक्‍टरांची नावे आणि पत्ते याच लेखामध्ये प्रसिद्ध केले आहेत. 

 सहभागासाठी होण्यासाठी क्लिक करा

आहार, व्यायाम आणि विश्रांती या तीन गोष्टींवर ‘पल्स’, रक्तदाब, शुगर आणि ‘बीएमआय’ अवलंबून असतात. तंदुरुस्तीच्या चतुःस्तंभाचे मूलतत्त्व या तीन गोष्टी आहेत. त्यामुळे या गोष्टींमध्ये नियमितता ठेवल्यास आपलं आरोग्य निरामय राहू शकते. त्यासाठी हे चारही ‘नंबर्स’ दर महिन्याला तुम्हाला माहिती असले पाहिजे. त्याची अचूक आणि नियमित नोंद तुम्ही तुमच्याकडे ठेवणे, ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी ‘सकाळ’तर्फे ‘नो युवर नंबर्स’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ची पुणे शाखा आणि पुण्यातील रुग्णालयांच्या संघटनेने सहकार्याचा हात दिला आहे. यांच्या मदतीने हा उपक्रम आम्ही पुणेकरांपर्यंत घेऊन येत आहोत. 

रक्तदाब का नियमित पाहावा?
रक्तदाब म्हणजे हृदयाच्या आकुंचन-प्रसारणाने शरीरात खेळणाऱ्या रक्तावरचा दाब. रक्तातून सर्व प्रकारची पोषकद्रव्ये, प्राणवायू संपूर्ण शरीराला मिळतात. त्यामुळे रक्तदाब कमी होतो, त्या वेळी शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना आवश्‍यक पोषकद्रव्ये पोचविले जात नाहीत. रक्तदाब वाढतो त्या वेळी रक्तवाहिन्यांना इजा होऊन शरीराच्या अंतर्गत रक्तस्राव होण्याचा धोका असतो. थोडक्‍यात, रक्तपुरवठ्यावर पेशींचे जिवंत आणि त्या व्यक्तीचा जिवंतपणा अवलंबून असतो. त्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. अविनाश भोंडवे, वैद्यकीय तज्ज्ञ

पल्स मोजणे का महत्त्वाचे?
पल्स म्हणजे हृदयाचे ठोके नाडीच्या स्वरूपात आपण मोजतो. सामान्यतः पल्स ६० ते ९० प्रतिमिनिट असतो. पण, व्यायामाच्या अभावामुळे ‘पल्स’ वाढते. अशा लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. ज्यांचा पल्स प्रतिमिनिट ६० पेक्षा कमी असतो, त्यांचे हृदयाचे आरोग्य चांगले असते.
- डॉ. राहुल पाटील, हृदयविकारतज्ज्ञ

‘बीएमआय’ कमी असण्याचे फायदे?
वजन आणि उंचीचे गुणोत्तर म्हणजे ‘बीएमआय’. जगभरात ‘बीएमआय’चे प्रमाण २५ असले, तरीही भारतीयांमध्ये तो २२.५ पेक्षा कमी असणं चांगलं आहे. ‘बीएमआय’च्या प्रमाणात रुग्णाला येणारे आजार आणि त्याची तीव्रता वाढते. पण ‘बीएमआय’ हा एकमेव निकष नसतो. त्याच बरोबर कंबरेचा घेर, चरबीचे प्रमाण यावर रुग्ण स्थूलतेच्या कोणत्या पातळीवर आहे, हे ठरवता येते.  
- डॉ. जयश्री तोडकर, बॅरियट्रिक सर्जन

रक्तातील साखर नियंत्रित का असावी?
शरीराला साखरेमुळे ऊर्जा देते. प्रत्येक पेशीच्या कार्याला ती आवश्‍यक असते. साखरेचे प्रमाण नियंत्रित असणं आवश्‍यक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये जास्त साखर राहणे हे घातक असते. कारण, त्यामुळे पेशी खराब होतात आणि अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो. जास्तीची साखर पेशींमध्ये साठविली जाते. शरीरात जास्त साखर असल्याने हृदय, डोळा, मेंदू या साऱ्या अवयवांचे कार्य बिघडते. त्यामुळे साखर नियंत्रित असली पाहिजे.
- डॉ. शैलजा काळे, मधुमेहतज्ज्ञ

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुमच्या जवळच्या डॉक्टर किंवा रुग्णालयाशी संपर्क साधा...

No photo description available.