जपानी पर्यटक महिलेचा रेल्वेत विसरलेला टॅब चार तासांत केला परत

औरंगाबाद : पर्यटनासाठी शहरात आलेल्या जपानच्या विदेशी महिला पर्यटकांचा रेल्वेत विसरलेला टॅब रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या तत्परेमुळे अवघ्या चार तासांत परत केला. याबद्दल पर्यटक महिलेने सर्वांचे आभार मानले. सीआरपीएफ जवानांनी दिलेल्या माहितीनुसार,...

जपानी पर्यटक महिलेचा रेल्वेत विसरलेला टॅब चार तासांत केला परत

औरंगाबाद : पर्यटनासाठी शहरात आलेल्या जपानच्या विदेशी महिला पर्यटकांचा रेल्वेत विसरलेला टॅब रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या तत्परेमुळे अवघ्या चार तासांत परत केला. याबद्दल पर्यटक महिलेने सर्वांचे आभार मानले.

सीआरपीएफ जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, जपान येथील मिकी कानेको (वय 38) या शनिवारी (ता.21) पहाटे चारच्या सुमारास मुंबईहून आलेल्या देवगिरी एक्‍स्प्रेसने औरंगाबाद रेल्वेस्थानकावर उतरल्या. रेल्वेस्थानकातून गाडी सुटताच त्यांना त्यांच्याजवळचा टॅब रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब रेल्वे सुरक्षा दलाचे हेडकॉन्स्टेबल एस.डब्ल्यू. गवई यांना सांगितली. गवई यांनी क्षणाचाही विलंब न लावता ही माहिती नांदेड येथील नियंत्रण कक्षाला दिली.