पंतप्रधान मोदींनी ग्वाही दिली; पण, कर्नाटकात डिटेंशन सेंटर तयार!

बंगळूर (Bengaluru) : दिल्लीत रामलीला मैदानावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या नावाखाली देशात निर्वासितांसाठी एकही ताबा केंद्र (डिटेंशन सेंटर-foreign detention centre for the illegal immigrants)उभारले जाणार...

पंतप्रधान मोदींनी ग्वाही दिली; पण, कर्नाटकात डिटेंशन सेंटर तयार!

बंगळूर (Bengaluru) : दिल्लीत रामलीला मैदानावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या नावाखाली देशात निर्वासितांसाठी एकही ताबा केंद्र (डिटेंशन सेंटर-foreign detention centre for the illegal immigrants)उभारले जाणार नाही, असा शब्द दिला. तरी, कर्नाटकने अवैध निर्वासितांसाठी ताबा केंद्र उभारले आहे. 

बंगळूरपासून 30 किलोमीटर अंतरावरील सोंडेकोप्पा येथे हे केंद्र उभारले आहे. येथील इमारतीभोवती कुंपण भिंतीवर काटेरी तार असून, दोन बाजूला सुरक्षा मनोरे उभारले आहेत. इंग्रजी "एल' आकारातील इमारतीच्या आत सात खोल्या, स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृह आहे. एकूण 15 खाटांच्या या केंद्राची तयारी अंतिम टप्प्यात आहे. येथे सध्या पोलिसाचा पहारा असून, कर्नाटक समाजकल्याण विभागाचे काही कार्यकर्ते तेथे पाहणी करण्यासाठी आले होते. या केंद्राचे उद्‌घाटन 1 जानेवारी रोजी होण्याची शक्‍यता आहे. 
केंद्रीय गृह मंत्रालयाने जानेवारी 2019 मध्ये राज्य सरकारांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्नाटकने अवैध निर्वासितांसाठी हे ताबा केंद्र तयार केले आहे.

Image

Image

समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहाची इमारत ताब्यात घेऊन तिचे रूपांतर परदेशी नागरिकांसाठी प्रतिबंध केंद्रात करण्याचा आदेश राज्य सरकारने गेल्या महिन्यात बंगळूर पोलिसांना दिला होता. हे ताबा केंद्र 2020 पासून पूर्णपणे कार्यान्वित करण्याचा आदेशही सरकारने नुकताच दिला होता.

Image