who is tiktok star nancy 

पुणे : सध्याच्या सोशल मिडीयाच्या जगात टिकटॉकने सगळ्यांनाच वेड लावले आहे. अनेकजण आपले व्हिडिओ बनवून त्याला विशिष्ट आवाज देऊन तसेच आपल्या आवाजातील व्हिडिओ सोशल मिडीयासोबतच टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतात. यामधून काहीजण एका दिवसात स्टारही...

who is tiktok star nancy 

पुणे : सध्याच्या सोशल मिडीयाच्या जगात टिकटॉकने सगळ्यांनाच वेड लावले आहे. अनेकजण आपले व्हिडिओ बनवून त्याला विशिष्ट आवाज देऊन तसेच आपल्या आवाजातील व्हिडिओ सोशल मिडीयासोबतच टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतात. यामधून काहीजण एका दिवसात स्टारही होतात. एका एका व्यक्तीचे टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशाच एका नॅन्सी नावाच्या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड लावले आहे.

 

कोण आहे टिकटॉक स्टार नॅन्सी
नॅन्सीचे पूर्ण नाव नॅन्सी ज्वेल मॅकडोनी आहे. नॅन्सीला तिला ली शुंगरी या टोपण नावानेदेखिल ओळखले जाते. नॅन्सी ही दक्षिण कोरियाची असून तिचा जन्म दक्षिण कोरियातील डेगु या शहरात १३ एप्रिल २००० रोजी झाला आहे. तिचे प्राथमिक शिक्षण दक्षिण कोरियातच झाले आहे. नुकतेच ०९ फेब्रुवारी २०१८ मध्ये तिने आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. 

Image result for who is tik tok star nancy

नॅन्सीला लहानपणापासूनच गाणे आणि डांसची आवड होती. त्यामुळे तिने वयाच्यया ११ व्या वर्षी एका डांस स्पर्धेत भाग घेतला होता. तिने या स्पर्धेत केलेल्या प्रदर्शनामुळे लोक तिचे फॅन्स झाले होते. नॅन्सी दिसायला खूप सुंदर असल्याने लोक तिच्याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ लागले. याचा तिला स्टार होण्यासाठी मोठा फायदा झाला. नॅन्सी सध्या दक्षिण कोरियाच्या मोमोलँड या ग्रुपची सदस्य आहे. ज्यामुळे तिला नॅन्सी मोमोलँड नावानेही ओळखले जाते. ती एक मोठी गायक आणि डांसर असल्याने तिचे मोठ्या प्रमाणावर गाण्याचे अल्बमदेखिल आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

the way she slicks her hair back uwu - #낸시 #NANCY #MOMOLAND #모모랜드 _ Sleeppage

A post shared by MOMOLAND NANCY (@nancy.momoland) on

म्हणून नॅन्सी टिकटॉक स्टार झाली
नॅन्सी टिकटॉकवर व्हायरल झाली असून तिचे टिकटॉवर प्रचंड फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी टिकटॉवर थ्रीडी स्केचचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका मुलीचा चेहरा बनवण्यात आला होता. ती मुलगी नॅन्सी होती. त्यानंतर एका मुलाने नॅन्सीचा एक व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर, नॅन्सीच्या सौंदर्याचे अनेकजण फॅन झाले. नॅन्सी इन्स्टाग्रामवरही असून तिचे इन्स्टाग्रामवर एकूण ०९ लाख फॉलोअर्स आहेत.